Narhari Zirwal Viral Photo From Airport: अस्सल मराठमोळ्या वेशात मिस्टर आणि मिसेस झिरवळ जपान दौर्‍यावर रवाना; एअरपोर्ट वरील फोटोची सोशल मीडीयात चर्चा (View Pic)

जपान मध्ये 11 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान हा दौरा असून त्यावेळी आमदार काही खाजगी संस्था, सरकारी संस्था यांना भेट देणार आहेत.

Narhari Zirwal | Twitter

राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखा तर्फे आयोजित अभ्यास दौर्‍यामध्ये नरहरी झिरवळ यांचा देखील समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली काही आमदार या दौर्‍यात सहभागी झाले आहेत. त्यापैकी एक झिरवळांनी जपानला रवाना होण्यापूर्वी एअरपोर्ट वरील एक फोटो ट्वीट केला आहे. दरम्यान सपत्निक  झिरवळ आपल्या अस्सल पारंपारिक मराठी वेशभूषेमध्ये होते. त्यांचा हा लूक सध्या वायरल झाला आहे. अनेकांनी त्यांच्या फोटोवर कमेंट करत त्यांच्या साधेपणाचं कौतुक केले आहे. राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ हे आमदार असूनही आजही करतात शेती; पाहा त्यांचा वायरल झालेला हा फोटो.

पहा नरहरी झिरवळ यांचा वायरल एअरपोर्ट लूक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)