Mumbai Rains: पालघर मध्ये माडाच्या झाडावर वीज कोसळली अन पेटलं झाडं; घटनेचा व्हीडिओ वायरल (Watch Video)
पालघर च्या वडराई भागात माडाच्या झाडांना वीज कोसळल्याने आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई सह महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस बरसत आहे. पालघर मध्ये एका माडाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. यानंतर झाडं पेटलं. सोशल मीडीयामध्ये या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान वायरल होत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून स्थिती थोडी सुधारण्याची शक्यता आहे. पण अजूनही 1-2 दिवस अवकाळी पावसाचं संकट राज्यावर कायम आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)