Mangoes On Neem Tree: काय सांगता? कडुलिंबाच्या झाडाला लागले रसाळ आंबे; मंत्र्यांच्या बंगल्यातील आश्चर्यकारक चित्र पाहून सगळेच थक्क (Watch Video)

शनिवारी जेव्हा मंत्र्यांनी हे झाड पाहिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर या झाडाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

Mangoes In Neem Tree

Mangoes On Neem Tree: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या ठिकाणी पंचायत ग्रामीण विकास आणि कामगार विभागाचे मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या बंगल्यात लावलेले झाड अचानक चर्चेत आले आहे. हे झाड कडुलिंबाचे आहे, मात्र त्याला आंब्याची फळे लागली आहेत. शनिवारी जेव्हा मंत्र्यांनी हे झाड पाहिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर या झाडाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. नवभारत टाइम्स डॉट कॉमने घटनास्थळी भेट दिली असता, त्यांनाही कडुलिंबाच्या झाडाला आंब्याची फळे येत असल्याचे दिसले.

याबाबत माहिती देताना मंत्री म्हणतात, ‘आज माझ्या भोपाळ येथील निवासस्थानी कडुलिंबाच्या झाडावर आंब्याची फळे पाहिल्यावर माझे मन आनंदाने भरून आले, हा प्रयोग काही कुशल बागायतदारांनी केला असावा, जो आश्चर्यापेक्षा कमी नाही.’ भोपाळच्या प्रोफेसर कॉलनीजवळ सिव्हिल लाइन्समधील बी-7 बंगला हे मंत्री प्रल्हाद पटेल यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या बंगल्याभोवती मोठ्या प्रमाणात झाडे आणि हिरवळ पसरलेली आहे. हे कडुलिंबाचे झाड देखील त्यापैकीच एक आहे. या झाडाला आंब्याची फळे लागली आहेत. (हेही वाचा: Z Class Security For Baby Elephant: हत्तीच्या पिल्लाला पालकांकडून 'झेड प्लस सुरक्षा'; मनमोहक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now