Malaysian PM Anwar Ibrahim Sings Hindi Songs: भारत दौऱ्यावर असलेले मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी गायली किशोर कुमार व मुकेश यांची गाणी, व्हिडिओ व्हायरल (Watch)
या दोन्ही गाण्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अन्वर इब्राहिम तीन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत.
Malaysian PM Anwar Ibrahim Sings Hindi Songs: दिग्गज गायक किशोर कुमार, मुकेश यांचे देशभरात तसेच जगभरात चाहते आहेत. महत्वाचे म्हणजे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हेदेखील या दोन्ही गायकांचे मोठे चाहते आहे. अन्वर इब्राहिम सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी या दोन्ही गायकांची लोकप्रिय गाणी गायली. किशोर कुमारचे 'ख्वाब हो तुम या कोई हकीकत कौन हो तुम बताओ...’, तर मुकेश यांचे, ‘दोस्त दोस्त ना रहा...’ हे गाणे त्यांनी गुणगुणले. या दोन्ही गाण्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अन्वर इब्राहिम तीन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत. 2015 मध्ये वर्धित धोरणात्मक भागीदारीमध्ये उभ्या राहिलेल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देश पुढाकार घेत आहेत.
भारत हा एक महत्त्वाचा देश असल्याचे सांगून मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही देश संवेदनशील असोत किंवा विरुद्ध असोत सर्व मुद्द्यांवर सख्ख्या भावांप्रमाणे चर्चा करतात, कारण मैत्रीचा खरा अर्थ हाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे भाऊ आहेत असे सांगत, आम्ही सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी वाढवण्यास सहमती दर्शवली आहे, अन्वर इब्राहिम यांनी सांगितले. (हेही वाचा; Chhaava Teaser: अभिनेता Vicky Kaushal च्या दमदार अंदाजातील 'छावा' चा टीझर जारी; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित बॉलिवूड सिनेमा)
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी गायली हिंदी गाणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)