Chhaava Teaser: अभिनेता Vicky Kaushal च्या दमदार अंदाजातील 'छावा' चा टीझर जारी; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित बॉलिवूड सिनेमा

'छावा' सिनेमा 6 डिसेंबर 2024 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Chhaava Teaser: अभिनेता Vicky Kaushal  च्या दमदार अंदाजातील 'छावा' चा टीझर जारी; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित बॉलिवूड सिनेमा
Chhaava Teaser | Instagram

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर बॉलिवूडमध्ये 'छावा' हा आगामी सिनेमा बनणार आहे. या सिनेमाचा टीझर आज रीलीज करण्यात आला आहे. अभिनेता विक्की कौशल या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून त्याचा दमदार अंदाज टीझर मध्ये दिसून आला आहे. 6 डिसेंबर 2024 ला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याच्या गादीवर बसून संभाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी केलेला पराक्रम आता सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. जारी टीझर मध्ये विक्की कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत मुघल सैन्याशी दोन हात करताना दिसत आहे.

छावा चा टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2024 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).