Viral Video: मुझफ्फरनगरमध्ये चाकू घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसून नर्सचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; कर्मचार्यांनी आरोपीला पकडून केली मारहाण
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दार ठोठावल्यानंतर आरोपी वॉर्डात कसा शिरला आणि आत शिरल्यावर त्याने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दानिश नावाच्या व्यक्तीने शनिवारी (18 नोव्हेंबर) रात्री मुझफ्फरनगर जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश केला आणि वॉर्डातील महिला नर्सचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिला चाकूने धमकावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दार ठोठावल्यानंतर आरोपी वॉर्डात कसा शिरला आणि आत शिरल्यावर त्याने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा पुरुष महिलेवर जबरदस्ती करत होता आणि महिलेने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट दिसत आहे. (हेही वाचा - Gujarat: पोलिसच झाले चोर! पोलिस ठाण्यातील 2 लाखांची दारू आणि पंखे केले लंपास, ASI सह पाच जणांना अटक)
UP : मुज़फ्फरनगर के जिला अस्पताल के इमरजेंसी वार्ड में घुसे युवक दानिश ने नर्स के साथ जबरदस्ती करने की कोशिश की। चाकू से धमकाते और गेट बंद करते सीसी कैमरे में यह घटना कैद हो गई। लोगो ने आरोपी युवक को दबोचकर पुलिस के हवाले कर दिया।@Uppolice https://t.co/BQvKm6xyjZ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)