Kanpur Shocker: 'Krrish' पाहून भारावला तिसरीच्या वर्गातील मुलगा; पहिल्या मजल्यावरून मारलेल्या उडीत गंभीर जखमी
सुपरहिरो 'क्रिश' ची फिल्म पाहून त्याच्या प्रभावाखाली येत एका मुलाने शाळेत पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याचा एक प्रकार समोर आला आहे.
लहान मुलांना आजकाल टीव्ही, सोशल मीडीयाचा अॅक्सेस सहज झाल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. कानपूर मध्ये किदवई नगर च्या वीरेंद्र स्वरूप एज्युकेशन सेंटरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये सुपरहिरो 'क्रिश' ची फिल्म पाहून त्याच्या प्रभावाखाली येत एका मुलाने शाळेत पहिल्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तोंडाला. पायाला आणि डोळ्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सध्या त्याचा व्हीडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. UP Horror: दोनचा पाढा न आल्याने शिक्षकाने मुलाच्या हातावर चालवली ड्रिल मशीन; Kanpur मधील धक्कादायक घटना.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)