Ice-Cream With Semen and Urine: किळसवाणे! आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथुन करून ग्राहकाच्या फालुदामध्ये मिसळले वीर्य व मूत्र; तेलंगणामधील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल (Watch)

यावेळी दूषित आइस्क्रीमचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Ice-Cream With Semen and Urine

Ice-Cream With Semen and Urine: तेलंगणातील वारंगलमध्ये एका आईस्क्रीम विक्रेत्याने आपले मूत्र आणि वीर्ययुक्त फालुदा विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. उन्हाळी हंगामामुळे आइस्क्रीमच्या मागणीत वाढ होत आह्जे व बनावट उत्पादक याचा फायदा घेत आहेत. ॲसिड आणि खराब-गुणवत्तेच्या घटकांसह बनवलेले आईस्क्रीम विकले जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत, परंतु आता वारंगल जिल्ह्यात समोर आलेली बाब अतिशय किळसवाणी आणि भयानक आहे. वारंगल जिल्ह्यातील नेककोंडा भागात बालाजी नावाच्या आईस्क्रीम स्टॉलवर लघवी आणि वीर्ययुक्त दूषित फालुदा व आइस्क्रीमची विक्री केली जात आहे. आईस्क्रीम विक्रेत्याने फालुदामध्ये मूत्र आणि वीर्य मिसळल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आईस्क्रीम विक्रेता दिवसाढवळ्या स्टॉलच्या मागे हस्तमैथुन करत आहे आणि नंतर ते वीर्य व मुत्र तो फालुदामध्ये मिसळतो.

ही धक्कादायक माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी आइस्क्रीम स्टॉलवर छापा टाकला. यावेळी दूषित आइस्क्रीमचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना कोठडी सुनावली आहे. (हेही वाचा: Crocodile Attacks Video: मगरीचा हल्ला, जबड्यातून थोडक्यात बचावला कर्मचारी; प्राणीसंग्रहालयातील घटना, व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)