Hummer H1 'X3' Viral Video: दुबईतील अब्जाधीश शेख हमाद यांच्या हमरचा व्हिडिओ व्हायरल; नेहमीच्या मॉडेलपेक्षा 3 पट मोठा आहे आकार (Watch)

मोटोरियसच्या अहवालानुसार, तिप्पट आकारामुळे याला Hummer H1 3X असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी 46 फूट लांब, 21.6 फूट उंच आणि 19 फूट रुंद आहे.

Hummer H1 'X3' Viral Video

विशाल Hummer H1 'X3' गाडीचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही गाडी दुबईचे अब्जाधीश शेख हमद बिन हमदान अल नाह्यान यांची आहे. हे शेख 'दुबईचा इंद्रधनुष्य शेख' म्हणूनही ओळखले जातात. विशेष म्हणजे शेख यांची ही हमर नेहमीच्या मॉडेलपेक्षा खूपच मोठी आहे. हमाद यांना ऑटोमोबाईल्सची आवड आहे. शेख त्यांच्या संपत्तीसोबतच त्यांच्या प्रचंड कार संग्रहासाठीही ओळखले जातात. हमाद यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या गाड्यांवर खर्च केला आहे. याच संग्रहाचा एक भाग म्हणजे Hummer H1, जो नियमित आवृत्तीपेक्षा खूप मोठा आहे. या मोठ्या आकाराच्या Hummer H1 चा आकार सामान्य मॉडेलपेक्षा 3 पट मोठा आहे.

मोटोरियसच्या अहवालानुसार, तिप्पट आकारामुळे याला Hummer H1 3X असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी 46 फूट लांब, 21.6 फूट उंच आणि 19 फूट रुंद आहे. शेख हमद यांच्यासाठी ही गाडी खास तयार करण्यात आली आहे. शेख हमद हे अमिरातीच्या राजघराण्याचे सदस्य आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 20 अब्ज डॉलर आहे. (हेही वाचा: Mercedes-Benz G-Class भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now