Greater Noida: सेक्टर 1 मधील विहान हेरिटेज सॅफायर सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून कुत्र्याला फेकून दिले; प्राण्याचा मृत्यू (Disturbing Video Viral)
त्यानंतर त्याने या कुत्र्याला 7 व्या मजल्यावरून खाली फेकून दिले.
नोएडामधून कुत्र्यांच्या हल्ल्याची अनेक प्रकरणे याआधी समोर आली आहेत. आता एका कुत्र्याच्या क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा वेस्टमधील सेक्टर-1 येथील एका सोसायटीमध्ये एका भटक्या कुत्र्याला सातव्या मजल्यावरून फेकून देण्यात आले आहे. यामध्ये कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रेटर नोएडामधील विहान हेरिटेज सॅफायर सोसायटीमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला.
अहवालानुसार, इथल्या रहिवाशाने एका भटक्या कुत्र्याला खायला देण्याच्या बहाण्याने घरात नेले आणि नंतर बराच वेळ घरात ठेवल्यानंतर टेरेसवर नेले. त्यानंतर त्याने या कुत्र्याला 7 व्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मोठ्या उंचीवरून पडल्याने कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराबाबत सोसायटीतील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (हेही वाचा: Singapore Shocker: मरीना बे कॅसिनोमध्ये व्यक्तीने जिंकले 4 मिलिअन डॉलर्स; उत्साहाच्या भरात आला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)