Anna Mani 104th Birth Anniversary Google Doodle: भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ ॲना मणी यांच्या जयंती निमित्त गूगल ने साकारलं खास डूडल
ॲना मणी यांनी अक्षय ऊर्जा बाबतच्या कामाचाही पाया रचला आहे.
भारताची पहिली महिला वैज्ञानिक ॲना मणी (Anna Mani)यांच्या 104 व्या जयंती निमित्त गूगलने आज खास डूडल साकारलं आहे. ॲना मणी या हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होत्या. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी विकसित केलेल्या अभ्यासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. ॲना मणी या महिलांसाठी आदर्श देखील आहेत. त्यांनी पितृसत्ताशी लढा दिला आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात अव्वल स्थानी आल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)