PIB Fact Check: सरकार कडून 8 नोव्हेंबर पासून 65 हजार रूपये आणि 9500 रूपयांच्या वस्तू मोफत मिळणार असल्याचा खोटा दावा वायरल; जाणून घ्या सत्य
सरकारी सुत्रांकडून खात्री करून घेतल्याशिवाय सरकारी योजनांच्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे.
मोदी सरकार कडून 8 नोव्हेंबर पासून 65 हजार रूपये आणि 9500 रूपयांच्या वस्तू मोफत मिळणार असल्याचा खोटा दावा वायरल झाला होता. युट्युब वर 'Daily Study' या युट्युब चॅनलवर एका व्हिडिओच्या माध्यमातून हा खोटा दावा करण्यात आला होता. पीआयबीने या दाव्याच्या दखल घेत अशाप्रकारे कोणतीही घोषणा सरकार कडून करण्यात आली नसल्याचा आणि हा दावा खोटा असल्याचं X वर पोस्ट करत म्हटलं आहे. सोशल मीडीयात अनेक बनावट दाव्यांची पोलखोल पीआयबी फॅक्ट चेक वर केली जाते. सरकारी सुत्रांकडून खात्री करून घेतल्याशिवाय सरकारी योजनांच्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे.
पहा ट्वीट