Fact Check: केंद्र सरकार सर्वांना देणार मोफत स्मार्टफोन? सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्य

एका व्हिडिओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023' ही नवी योजना चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fact Check

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार एका योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना मोफत स्मार्टफोन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'सरकारी व्लॉग' हे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या एका व्हिडिओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023' ही नवी योजना चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्वांना मोफत स्मार्टफोन देत आहे.

आता पीआयबीने या संदेशाची सत्यता तपासली असता, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचे आढळून आले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की, हा व्हिडीओ खोटा असून हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. अनेक वेळा अशा व्हिडिओंसोबत काही लिंक्सही शेअर केल्या जातात व त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती या लिंक्सवर मागवली आहे. त्या लिंकवर क्लिक करताच तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सकडे जाते. यामुळे तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते किंवा अशी वैयक्तिक माहितीही अनेक वेळा सार्वजनिक डोमेनमध्ये जाते, जी तुमच्यासाठी योग्य नाही. (हेही वाचा: सर्व आधार कार्ड धारकांना केंद्र सरकार 4,78,000 रुपये कर्ज देण्याचा दावा खोटा, सोशल मीडियावरील मेसेजपासून सावधान!)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now