Fact Check: 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने' अंतर्गत सर्व मुलींना मिळणार 1,50,000 रुपये? जाणून घ्या व्हायरल संदेशामागील सत्य
सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा एका YouTube व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत, प्रत्येक मुलीला 1,50,000 रुपये दिले जातील असा दावा यामध्ये केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना सुरू केली असून, सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा एका YouTube व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितली आहे. पीआयबी फॅक्ट चेक हँडलच्या वतीने ट्विट करून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकार अशी कोणतीही योजना चालवत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement