Elephant Attack Viral Video: अभयारण्यात रस्त्याच्या कडेला फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर हत्तीचा हल्ला; धावत केला पाठलाग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch)

या ठिकाणी रस्त्याच्या कडेला फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन लोकांकडे हत्तीची नजर केली. हत्तीला पाहून हे दोघे पळू लागले व त्यानंतर हत्तीने त्यांचा पाठलाग सुरु केला.

Elephant Attack Viral Video

Elephant Viral Video: केरळच्या वायनाड वन्यजीव अभयारण्यात एका हत्तीने प्रवाशांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जंगलातून जात असताना वाहनातून बाहेर आलेले हे प्रवासी मोठ्या आश्चर्यकारकरित्या हत्तीच्या हल्ल्यातून बचावले आहेत. बुधवारी सकाळी बथेरी-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावरील मुथांगजवळ ही घटना घडली. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन लोकांकडे हत्तीची नजर केली. हत्तीला पाहून हे दोघे पळू लागले व त्यानंतर हत्तीने त्यांचा पाठलाग सुरु केला. धावताना यातील एक व्यक्ती खाली पडली व त्यावेळी हत्तीने त्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कसाबसा आपला जीव वाचवला. त्याचवेळी एक लॉरी या मार्गाने आली आणि त्यामुळे हत्तीचे लक्ष विचलित झाले. त्यानंतर हाती आल्या त्या मार्गाने निघून गेला. सध्या या अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाचे फुटेज व्हायरल होत आहे. (हेही वाचा: हैदराबादमध्ये TSRTC बस कंडक्टरवर महिलेचा प्राणघातक हल्ला, व्हिडिओ भडकला)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by wayanadgram(220 K Awesome ppl) (@wayanadgram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now