Uttar Pradesh: नवरदेवाला बांधले, वऱ्हाड्यांना कोंडले; हुंडा मागितल्याने नवरीकडील मंडळींनी दाखवला इंगा (See Photos)

वरमाळा दरम्यान अचानक वराने हुंड्याची मागणी सुरू केली. यामुळे वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ठाम राहिल्याने संतप्त कुटुंबीयांनी वर अमरजीतला झाडाला बांधले.

A dowry-seeking groom (PC - Twitter/@bstvlive)

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात हुंड्याची मागणी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना चांगलीचं महागात पडली आहे. सासरवाडीतील लोकांनी वराला झाडाला बांधून ठेवत त्याच्या नातेवाईकांना ओलीस ठेवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. बुधवारी रात्री जौनपूर येथून मांधाता भागातील हरखपूर येथे मिरवणूक आली होती. वरमाळा दरम्यान अचानक वराने हुंड्याची मागणी सुरू केली. यामुळे वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ठाम राहिल्याने संतप्त कुटुंबीयांनी वर अमरजीतला झाडाला बांधले. यासोबतच वराचे अनेक नातेवाईक आणि वऱ्हाड्यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे लग्नस्थळी गोंधळ उडाला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सोबत घेतले. पोलीस ठाण्यात दिवसभर यासंदर्भात गोंधळ सुरू राहिला. मात्र निकाल लागला नाही. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा - No Mutton No Marriage: वऱ्हाडाला मटण पडलं अपूर; वऱ्हाडी मंडळींनी आणखी मटणाची मागणी केल्याने वधूने मोडलं लग्न)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement