काँग्रेस आमदार राजेंद्र सिंह बिधुरी यांचा जुना व्हिडिओ चर्चेत; मदत मागायला आलेल्या वृद्धाची पगडी पायाने तुडवली (Watch Video)

मुलाला नोकरी मिळावी म्हणून वृद्ध व्यक्ती आमदाराकडे मदत मागायला आला होता. पण तेव्हा त्याच्यासोबत आमदाराने गैरवर्तन केले होते.

Rajasthan | Twitter

बेगन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार राजेंद्र सिंह बिधुरी यांचा जुना व्हिडिओ चर्चेत आला आहे. यामध्ये आमदार मुलाला नोकरी मिळावी म्हणून मदत मागायला आलेल्या वृद्धाची पगडी पायाने तुडवताना दिसत आहेत. ही 2021 मधील घटना आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनीही टीका करत त्यांच्या ट्वीटर अकाऊंट वर तो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला मूळासकट काढून टाकलं जाईल असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement