China's Tallest Waterfall Is Fake: चीनची जगभरात नाचक्की; देशातील सर्वात उंच Yuntai Mountain धबधबा निघाला बनावट, पाईपमधून पुरवले जात आहे पाणी, व्हिडिओ व्हायरल (Watch)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेअर केल्या या व्हिडिओमध्ये धबधब्याच्या वरच्या डोंगरावरील खडकावर तयार केलेल्या कृत्रिम संरचनेतून पाणी बाहेर पडताना दिसत आहे.

China Yuntai Mountain Waterfall Video

China's Tallest Waterfall Is Fake: चीनमध्ये युंटाई माउंटन धबधबा (Yuntai Mountain Waterfall) नावाचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा देशातील सर्वात मोठा धबधबा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता हा धबधबा खोटा असल्याचे समोर आले आहे. या धबधब्याला चक्क पाइपद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सोशल मिडियावर या धबधब्याचा एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यामध्ये पाइपद्वारे पाणी पुरवले जात असल्याचे दिसत आहे. एका गिर्यारोहकाने हा खुलासा केला, त्यानंतर उद्यान अधिकाऱ्यांना हा धबधबा खोटा असल्याचे मान्य करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरात चीनची बदनामी होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेअर केल्या या व्हिडिओमध्ये धबधब्याच्या वरच्या डोंगरावरील खडकावर तयार केलेल्या कृत्रिम संरचनेतून पाणी बाहेर पडताना दिसत आहे. पार्क अधिकारी या धबधब्याला आशियातील सर्वात उंच धबधबा म्हणतात, जो 314 मीटर उंचीवरून कोसळतो. हा धबधबा पूर्व चीनच्या हेनान प्रांतात आहे. आता हे झरे नैसर्गिकरित्या वाहत नसून पाईपद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे मान्य करण्यात आले आहे. (हेही वाचा: Lions Viral Video: जंगलाच्या मधोमध रस्त्यावर दोन भयंकर सिंह, न घाबरता एक व्यक्ती बाईकवरून त्यांच्या जवळून गेला)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif