Chennai: चेन्नई विमानतळावर विदेशी दुर्मिळ प्राण्यांची तस्करीचे प्रकरण उघडकीस; Kingsnakes आणि Ball Python जप्त, Watch Viral Video
चेन्नई एअर कस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी बँकॉकहून TG-337 मध्ये आलेल्या एका पुरुष प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. चेक इन बॅगेज तपासणीत 1 डी ब्रेझा माकड, 15 किंग्सनेक, 5 बॉल पायथन आणि 2 अल्डाब्रा कासव आढळून आले.
Chennai: चेन्नई विमानतळावर प्राण्याच्या तस्करीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चेन्नई एअर कस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी बँकॉकहून TG-337 मध्ये आलेल्या एका पुरुष प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. चेक इन बॅगेज तपासणीत 1 डी ब्रेझा माकड, 15 किंग्सनेक, 5 बॉल पायथन आणि 2 अल्डाब्रा कासव आढळून आले.
जिवंत प्राणी बेकायदेशीररित्या आयात केल्याने या प्रवाशाला AQCS (अॅनिमल क्वारंटाइन आणि प्रमाणन सेवा) च्या सल्लामसलत करून थाई एअरवेजद्वारे मूळ देशात परत पाठवण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तस्करी करण्यात आलेल्या प्राण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्राण्यांच्या तस्करीचे फोटोज आणि व्हिडिओज पहा -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)