Bengaluru Water Crisis: प्राण्यांनाही बसत आहे बेंगळुरूमधील जलसंकटाचा फटका; पाण्याच्या शोधात खिडक्यांमधून स्वयंपाकघरात शिरले माकड, व्हिडिओ व्हायरल (Watch)

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तहानलेले माकड पाणी पिण्यासाठी घराच्या स्वयंपाकघरात घुसलेले दिसत आहे.

Bengaluru Water Crisis

Bengaluru Water Crisis: बेंगळुरू सध्या मोठ्या पाण्याच्या संकटाशी तोंड देत आहे. दररोज शहरातील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यात लोक पाण्याच्या समस्येवर आपले मत मांडत आहेत, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. लोकांना बाटलीबंद पाणी महागात विकत घ्यावे लागत आहेत. अशात पाण्याअभावी माणसांचेच नव्हे, तर प्राण्यांचेही हाल होत आहेत. त्यांनाही प्यायला पाणी मिळेनासे झाले आहे. शहरातील जलसंकट किती तीव्र झाले आहे याचा एक जिवंत पुरावा समोर आला आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तहानलेले माकड पाणी पिण्यासाठी घराच्या स्वयंपाकघरात घुसलेले दिसत आहे. हे माकड आरओ मधून पाणी पिण्याचा प्रयत्न करत आहे. अशाप्रकारे पाण्याच्या शोधात माकडे स्वयंपाकघराच्या खिडक्यांमधून सोसायटी आणि घरांवर हल्ला करत आहेत. (हेही वाचा: Tiger's Hunt Viral Video: जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वाघाने केली शिकार, व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now