Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रोमधील कपलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; Watch

आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील एका कपल्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात हे दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून बसलेले दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे चाळे केल्याने इतर प्रवाशांना मेट्रोमधून प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.

Delhi Metro Couple Video (PC - Twitter/ @shubhamrai80)

Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल होण्याचा सिलसिला थांबत नाही आहे. मेट्रोमधील अश्लील कृत्यांचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. नुकताच मेट्रोमध्ये बिकिनी घातलेल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोतील आणखी एक लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक जोडपे मेट्रोच्या फरशीवर बसून लिप लॉक करताना दिसत होते. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील एका कपल्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात हे दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून बसलेले दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे चाळे केल्याने इतर प्रवाशांना मेट्रोमधून प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. (हेही वाचा - Girl Drinking Liquor: तरुणीने एका घोटात गिळली ग्लासभर दारू, नंतर अशी दिली प्रतिक्रिया, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now