Viral Video: गयामध्ये वृद्धाच्या अंगावरून गेली संपूर्ण मालगाडी; पहा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ, Watch

गया-कोडरमा रेल्वे सेक्शनवरील पहारपूर रेल्वे स्थानकाच्या डाऊन मार्गावर मालगाडी उभी होती. मालगाडी जवळपास 1 ते 2 तास सिग्नलची वाट पाहत उभी होती. त्या वृद्धाला रेल्वे रूळाच्या पलीकडे जायचे होते, त्यामुळे म्हातारा मालगाडीच्या वॅगनच्या खालून रेल्वे रूळ ओलांडत होता. तेवढ्यात अचानक मालगाडीचा सिग्नल आला आणि ती सुरू झाली. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक घाबरले.

Train runs over an old man (PC - Twitter)

Viral Video: गयामध्ये एका वृद्धाच्या प्रसंगावधाने त्याचा जीव वाचला, तर इतर लोक त्यांना अशा प्रकारे जीव वाचवताना पाहून थक्क झाले आहेत. हे प्रकरण गया कोडरमा रेल्वे विभागाशी संबंधित आहे. गया-कोडरमा रेल्वे सेक्शनवरील पहारपूर रेल्वे स्थानकाच्या डाऊन मार्गावर मालगाडी उभी होती. मालगाडी जवळपास 1 ते 2 तास सिग्नलची वाट पाहत उभी होती. त्या वृद्धाला रेल्वे रूळाच्या पलीकडे जायचे होते, त्यामुळे म्हातारा मालगाडीच्या वॅगनच्या खालून रेल्वे रूळ ओलांडत होता. तेवढ्यात अचानक मालगाडीचा सिग्नल आला आणि ती सुरू झाली. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक घाबरले. त्यांना वृद्धाच्या जीवाची काळजी वाटत होती. मात्र, ही वृद्ध व्यक्ती काठी घेऊन रेल्वे रुळावर झोपली. मालगाडीखाली म्हातारा पडलेला पाहून स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली आणि सगळेच थक्क झाले. मात्र, वृद्धाच्या प्रसंगावधानाने त्याचे प्राण वाचले. सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (वाचा - Ambarnath Siding Empty EMU Rake Derailed: अंबरनाथमध्ये रिकामा EMU रेक रुळावरून घसरला; कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now