Delhi-Toronto Air India Flight: 4 लाखांचे तिकीट घेतले तरीही विमानात मिळालं तुटलेलं सीट; व्हिडिओ शेअर करत महिलेने केला खुलासा, पहा

तिने सांगितले की, हे मुलासाठी संभाव्य धोका असू शकते. दुर्दैवाने, मी तुटलेल्या सीटच्या हँडलचा फोटो काढायला विसरले. येथे सर्व वायर सिस्टममधून बाहेर पडत होत्या.

Woman got a broken seat on the plane (PC - Instagram)

Delhi-Toronto Air India Flight: पती आणि दोन मुलांसह दिल्लीहून टोरंटोला एअर इंडियाने विमानाने (Air India Flight) गेलेल्या एका महिलेने आपला अनुभव सांगितला आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम युजर श्रेयती गर्गने सांगितले की, मी तिकिटांसाठी लाखो रुपये खर्च केले पण फ्लाइटमध्ये निकृष्ट सुविधा मिळाल्या. विमानात तिला तुटलेले सीट मिळाले. व्हायरल व्हिडिओमध्ये, श्रेयतीने प्रथम तिच्या स्क्रीनवर इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टम दाखवली आणि ती व्यवस्थित काम करत नसल्याचे सांगितले. तसेच ओव्हरहेड लाईट काम करत नसल्यामुळे तिला फोनची टॉर्च लावावी लागली, हेही तिने व्हिडिओमध्ये दाखवले आहे.

याव्यतिरिक्त, व्हिडिओमध्ये श्रेयतीने पसरलेल्या तारांसह तुटलेल्या सीटच्या हँडलबद्दल सुरक्षेचा उल्लेख केला आहे. तिने सांगितले की, हे मुलासाठी संभाव्य धोका असू शकते. दुर्दैवाने, मी तुटलेल्या सीटच्या हँडलचा फोटो काढायला विसरले. येथे सर्व वायर सिस्टममधून बाहेर पडत होत्या. (हेही वाचा - Airplane window blows out Mid-Air: विमानाची खिडकी हवेतच उघडली, काय घडले पुढे? (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyti Garg (@humpty02dumpty)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)