Writer Prajakt Deshmukh Accident: प्रख्यात मराठी लेखक प्राजक्त देशमुख यांचा अपघात; थोडक्यात बचावला जीव (Watch)

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये देशमुख म्हणाले की, हायवेच्या चुकीच्या बाजूने जात असलेल्या ट्रकची सिमेंट डिव्हायडर ब्लॉकला धडक बसल्यानंतर या ट्रकची कारला धडक बसली.

Prajakt Deshmukh Accident

'देवबाभळी'सह अनेक नाटकांचे संवाद लिहिणारे प्रख्यात मराठी लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) यांचा शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात झाला. ही घटना भिवंडी फाट्याजवळ घडली. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये देशमुख म्हणाले की, हायवेच्या चुकीच्या बाजूने जात असलेल्या ट्रकची सिमेंट डिव्हायडर ब्लॉकला धडक बसल्यानंतर या ट्रकची कारला धडक बसली. या अपघातामध्ये देशमुख थोडक्यात बचावले. याबाबत प्राजक्त देशमुख यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये देशमुख म्हणतात- 'नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?'

'ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now