Worli Hit and Run Case: फरार 24 वर्षीय आरोपी Mihir Shah याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
वरळीच्या हिट अॅन्ड रन केस मध्ये अपघाताच्या वेळेस मिहिर शाह ड्रायव्हिंग सीट वर होता असे रिपोर्ट्स मधून समोर आले आहे.
वरळी मध्ये 45 वर्षीय महिलेला कार अपघातामध्ये ठार केल्यानंतर फारार असलेला 24 वर्षीय आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. मिहिरच्या मागावर मुंबई पोलिसांची सहा पथकं होती. दरम्यान मिहीरचा शोध घेण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. रविवारी अॅट्रिया मॉल परिसरामध्ये नाखवा दांम्पत्य बाईकवरून जात असताना मिहिरने त्यांना ठोकलं. यामध्ये महिला बाईक वरून पडल्यानंतर मिहिरने ब्रेक न मारता तिला फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. 'मम्मी माझे सर्वस्व! ती मला परत हवी' वरळी येथील BMW Hit And Run मध्ये ठार झालेल्या कावेरी नाखवा यांच्या मुलीची आर्त हाक (Watch Video).
मिहीर शाह अटकेत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)