उद्योगमंत्री राजीनामा देणार का? 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर Aaditya Thackeray यांच्याकडून टीका
गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले होते. आता टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्टही गुजरातच्या बडोद्याला गेला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दावा केला आहे की, सध्याच्या सरकारमुळे असे 4 प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, 'टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)