Western Railway Ticket Checking Drive: पश्चिम रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश; 60,000 अनधिकृत प्रवाशांकडून आकारला 173.89 कोटी रुपयांचा दंड

एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीत जवळपास 60,000 अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे.

Ticket Checking Drive

Western Railway Ticket Checking Drive: पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळावी यासाठी, मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्सवर तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे. ज्याद्वारे तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांच्या त्रासाला आळा घालता येईल. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने, एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले, त्याद्वारे 173.89 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली. महत्वाचे यामध्ये मुंबई उपनगर विभागातून 46.90 कोटी रुपये जमा झाले आहेत. पश्चिम रेल्वेनुसार, मार्च 2024 मध्ये बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह 2.75 लाख, तर तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांकडून 16.77 कोटी वसूल करण्यात आले. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीत जवळपास 60,000 अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Special Trains For Summer Holidays: उन्हाळ्याच्या सुटीसाठी प्रवाशांसाठी पुणे - मुंबईतून सुटणार विशेष गाड्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now