Western Railway Jumbo Block: पश्चिम रेल्वेचा उद्या रात्री 9 तासांचा जंबो ब्लॉक; दिवसभर वाहतूक सुरळीत सुरु राहणार

ब्लॉक कालावधीत, सर्व धिम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर चालवल्या जातील

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर 21.00 ते 06.00 वाजेपर्यंत नऊ तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच 23.00 ते 06.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो लाईन्सवर सात तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक 2/3 एप्रिल 2022 च्या मध्यरात्री अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान घेतला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

ब्लॉक कालावधीत, सर्व धिम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर चालवल्या जातील. या सेवांना विलेपार्ले येथे दुहेरी थांबा मिळेल. दोन्ही दिशेच्या गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबत सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)