Western Railway Jumbo Block: रविवार, 20 मार्च रोजी पश्चिम रेल्वेचा जंबो ब्लॉक; जाणून घ्या नक्की काय असतील बदल
अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर 10 ते 5 या दरम्यान सात तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाईल
पश्चिम रेल्वे 20 मार्च रोजी अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान तसेच राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची नोटीस शेअर केली आहे, ज्यामध्ये ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी ब्लॉक केला जाईल असे नमूद केले आहे. रविवार, 20 मार्च 2022 रोजी ही कामे करण्यासाठी, अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर 10 ते 5 या दरम्यान सात तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाईल.
यासोबत राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान 5 मार्गावर 10 ते 3.30 या वेळेत साडेपाच तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील उपनगरीय गाड्या अप आणि डाऊन स्लो मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)