Western Railway: मुंबईमध्ये 15-16 सप्टेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे मार्गावर 4 तासांचा ब्लॉक; सहा लोकल गाड्या रद्द
लोअर परळमधील डेलिसल रोड ओव्हरब्रिजवर सुरू असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे
चार तासांच्या पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉकमुळे उद्या पश्चिम रेल्वेवरील सहा लोकल सेवा रद्द होणार आहेत. 15-16 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री मध्यरात्री 01.10 ते 05.10 पर्यंत लोअर परळ येथे सर्व मार्गांवर रेल्वे वाहतूक चार तास ब्लॉक केली जाईल, परिणामी सहा लोकल गाड्या रद्द करण्यात येतील आणि सुमारे अर्धा डझन सेवा अंशतः रद्द करण्यात येतील. लोअर परळमधील डेलिसल रोड ओव्हरब्रिजवर सुरू असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)