Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज पाणीपुरवठा राहणार विस्कळीत; पहा कुठे असेल 100% पाणी कपात
बीएमसी कडून मुंबईकरांना पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई मध्ये काल रात्री पिसे येथील उदंचन केंद्रात आग लागल्यानंतर आज पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. या आगीमुळे जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा आज विस्कळीत राहणार आहे. काही ठिकाणी 100% तर काही ठिकाणी 30% पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई मध्ये आज टी विभाग (पूर्व आणि पश्चिम), एस विभाग (नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, विक्रोळी पूर्व), एन विभाग (विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व, सर्वोदय नगर, नारायण नगर), एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभाग, एफ दक्षिण व एफ उत्तर संपूर्ण विभाग, भंडारवाडा जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ई, बी आणि ए विभाग मध्ये 100% पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे तर उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभाग मध्ये 30% पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही .
पहा ट्वीट
पाणीपुरवठा बाधित होणारे परिसर#BMCUpdates https://t.co/MhpGTAA1I2 pic.twitter.com/tQqf1MlpIo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 26, 2024
मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील 24 तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर काही प्रमाणात पडेल. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान मुंबईवर पाणी संकट घोंघावत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये पाणी पुरवठा फेब्रुवारी महिन्यातच 50% च्या खाली गेल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकचा पाणी पुरवठा न झाल्यास बीएमसीने महिना अखेरीपासून पाणी कपातीचे संकट सांगितले आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2024 10:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

