Water Pipeline Burst at Powai: तानसा येथून मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची पाइपलाइन पवईमध्ये फुटली; 'या' भागातील पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम (Watch)
या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व्हॉल्व्ह बंद करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे बीएमसीने सांगितले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पाणी पाईपमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.
Water Pipeline Burst at Powai: तानसा येथून मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची पाइपलाइन पवई येथे फुटली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. बीएमसीने सांगितले की, पवई अँकर ब्लॉकजवळ तानसाची 1800 मिमी व्यासाची पाइपलाइन फुटली. यामुळे पाईपमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पाणी पाईपमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.
ही पाईप फुटल्याने वॉर्ड के/ई, वॉर्ड एच/ई, बेहराम पाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस, जी/एन वॉर्ड, दादर, अंधेरी पूर्व, कलिना, वांद्रे पूर्व यासह अनेक भागांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. या परिसरातील रहिवाशांना समस्येचे निराकरण होईपर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या पाईप दुरुस्त करून लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा; Mumbai Rain Update: मुंबईकरांनो घराबाहेर जाण्यापूर्वी सावध रहा! मुंबईत येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार)
मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची पाइपलाइन पवईमध्ये फुटली-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)