लोकल ट्रेनच्या स्पेशल डब्यात सहप्रवाशाचे दिव्यांग व्यक्ती सोबत गैरवर्तन (Watch Viral Video)

व्हिडिओ वायरल होऊनही, अद्याप रेल्वे पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पीडितेशी संपर्क साधला आहे आणि तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

मुंबई लोकल ट्रेन मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या विशेष कोचमध्ये सहप्रवाशांनी एका अपंग पुरूषावर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला आणि एक पुरूष पीडितेवर शारीरिक अत्याचार करत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना गुरुवारी सीएसएमटी-बदलापूर मार्गावरील घाटकोपर आणि ठाणे स्थानकांदरम्यान फास्ट ट्रेन मधील आहे. व्हिडिओ वायरल होऊनही, अद्याप रेल्वे पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पीडितेशी संपर्क साधला आहे आणि तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे, परंतु तो अद्याप पुढे आलेला नाही. 16 मे रोजी आरक्षित कोचमध्ये एका अंध महिलेवर अशाच प्रकारच्या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे.

मुंबई लोकल मध्ये दिव्यांगासोबत गैरवर्तन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement