VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch)

मॉरिस भाईने आधी अभिषेकयांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले आणि नंतर गोळ्या झाडल्या.

Abhishek Ghosalkar Shot Dead

Abhishek Ghosalkar Shot Dead: मुंबईमध्ये गुरुवारी (8 फेब्रुवारी) सायंकाळी दहिसर परिसरात उद्धव ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी अभिषेक यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. मॉरिस भाई असे आरोपीचे नाव असून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. मॉरिस भाईने आधी अभिषेकयांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले आणि नंतर गोळ्या झाडल्या. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते असून अभिषेक घोसाळकर हे त्यांचे पुत्र आहेत. अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक होते. गँगस्टर मॉरिस हा बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीमधील रहिवासी होता. त्याच्यावर बलात्कार, खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. (हेही वाचा; Money Laundering Case: कार डिझायनर दिलीप छाब्रिया आणि कुटुंबाकडून तब्बल 18 कोटींचे लाँडरिंग- ED)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)