अमरावतीमध्ये 12 ते 14 आणि 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरु
आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे.
अमरावती आरोग्य विभागाने 12 ते 14 आणि 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहीमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्यानं विद्यार्थ्यांचं लसीकरण केलं जात आहे. या मोहिमेला पालकांनीही सहकार्य करावं, असं आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी केलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)