Fire Breaks Out at Jindal Company Nashik: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत- केंद्रीय मंत्री भारती पवार
स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पॉली फिल्म फॅक्टरीला आग विझवण्यासाठी पथके तैनात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नाशिक येथील जिंदाल पॉलि फिल्म कंपनीला लागलेल्या आगीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, डॉ भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पॉली फिल्म फॅक्टरीला आग विझवण्यासाठी पथके तैनात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जिंदाल कंपनीच्या पॉली फिल्म फॅक्टरीत रिअॅक्टर प्लांटमध्ये स्फोट झाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 14 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे, असेही डॉ भारती प्रवीण पवार म्हणाल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)