Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सोबत दुजाभाव झाल्याचं म्हणत महाविकास आघाडी च्या खासदारांच्या मोदी सरकार विरोधात घोषणा ( Watch Video)
कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी तर अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील देखील संसद परिसरामध्ये निषेध नोंदवताना दिसले आहेत.
आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यांसाठी विशेष घोषणा झाल्या मात्र महाराष्ट्रासाठी कोणतीच विशेष योजना जाहीर न झाल्याने महाविकास आघाडी च्या खासदारांच्या मोदी सरकार विरोधात संसदेच्या परिसरात घोषणा दिल्या. ' मोदी सरकार हाय हाय' म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी तर अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील देखील निषेध नोंदवताना दिसले आहेत. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद आज अर्थसंकल्पात जाहीर झाली आहे. Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या केंद्रीय अर्थ संकल्पामुळे नेमकं काय स्वस्त आणि काय महागणार!
पहा मविआ खासदारांचा निषेध
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)