Union Budget 2022: आर्थिक संकल्पातून सामान्य आणि गरिबांना काय मिळाले? असा सवाल करत केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी साधला निशाणा
यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प 2022-23 हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे. राऊत यांनी असे म्हटले आहे की, सामान्यांना आणि गरिबांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळाले? अर्थसंकल्प हा भ्रामक, जुमला, गोलमाल आणि टाइमपास असून तो फ्लॉम सिनेमाप्रमाणे आहे.
Tweet: