Uddhav Thackeray On SP MLA Abu Azmi's suspension: 'निलंबन कायमचं व्हायला हवं' अबू आजमींच्या निलंबनावर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांंच्याबददल सन्मान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रासाठी ती दैवत आहेत. त्यांचा अपमान करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray On Abu Azami | X @ANI

औरंगजेब हा क्रुर शासक नव्हता असं वक्तव्य करून चर्चेत आलेल्या अबु आजमींवर आज विधानसभेत निलंबनाची कारवाई केली आहे. अबु आजमी यांचे निलंबन कायमचं व्हायला हवं अशी टीपण्णी केली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांंच्याबददल सन्मान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रासाठी ती दैवत आहेत. त्यांचा अपमान करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशी गोष्ट पुन्हा करण्याची हिंमत होणार नाही  असे ते म्हणाले आहेत. दरम्यान अबु आजमी यांचं निलंबन केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतं मर्यादित नसून कायमचं असायला हवं ते म्हणाले आहेत. दरम्यान अबु आझमी हे सपाचे आमदार असून मविआ चे मित्रपक्षाचे आमदार होते. दुसरीकडे सपाच्या अखिलेश यादवांनी मात्र अबुआझमींची पाठराखण केली आहे. SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानाबद्दल अबू आझमींवर कारवाई; संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित .

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement