Uddhav Thackeray on Nagpur Violence: ‘डबल इंजिन सरकार अपयशी ठरले, त्यांनी राजीनामा द्यावा’: नागपूर हिंसाचारावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही आणि गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्र्यांना विचारा की यामागे कोण आहे? कारण आरएसएसचे मुख्यालय तिथे आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी आणि त्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (17 मार्च) नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. आता या नागपूर दंगलीवरून शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला घेरले आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जर राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर का चालवला जात नाही?. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही आणि गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्र्यांना विचारा की यामागे कोण आहे? कारण आरएसएसचे मुख्यालय तिथे आहे. येथे डबल इंजिन सरकार आहे, जर डबल इंजिन सरकार अपयशी ठरले असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

भाजपवर हल्लाबोल करताना ठाकरे पुढे म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब आपल्या महाराष्ट्रात आला आणि त्याने शिवरायांच्यानंतर महाराष्ट्रावर हल्ला केला. तो आग्र्याला परत जाऊ शकला नाही व इथे त्याची कबर बांधली. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही औरंगजेबाची कबर काढून टाकू शकता, पण त्या काळात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना बोलवा. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत सांगितले की, नागपूरमधील हिंसाचार हा एक कट असल्याचे दिसून येते. जमावाने निवडक घरे आणि आस्थापनांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. (हेही वाचा; Nagpur Violence: नागपूर हिंसाचार, जाळपोळ, संचारबंदी यांसह गोंधळाने भरलेली रात्र; काय घडले?)

Uddhav Thackeray on Nagpur Violence:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement