Mumbai Local Train Update: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस; अप ट्रान्स-हार्बर मार्ग, कर्जत-कल्याण आणि कसारा-कल्याण विभागात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबईमध्ये आज संध्याकाळी गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस पडत आहे

Representational Image (Photo Credits: IANS)

मुंबईमध्ये आज संध्याकाळी गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस पडत आहे. अशात अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील ऐरोली स्टेशनजवळ पावसामुळे संध्याकाळी 6.20 पासून ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये खोलाम्बा निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी अपडेट्स दिली जातील अशी माहिती शिवाजी एम सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई यांनी दिली आहे.

तसेच, मुसळधार पावसामुळे कर्जत -कल्याण आणि कसारा-कल्याण विभागातही ओव्हरहेड वायर होल्ड करून ठेवण्यात अधूनमधून समस्या येत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement