Mumbai Shocker: बोरिवली स्थानकात तिकीट तपासकाला महिला प्रवासी आणि गुंडांकडून मारहाण; काय आहे नेमक प्रकरण? जाणून घ्या
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी अशा घटनेची पुष्टी केली परंतु कोणत्याही पक्षाने औपचारिक तक्रार किंवा एफआयआर दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai Shocker: पश्चिम रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर तैनात असलेल्या राहुल शर्माने विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका मुलीला थांबवले. त्यानंतर महिला आणि तिच्या सोबतच्या काही गुंडांनी राहुलला मारहाण केली. घटनास्थळी असलेल्या जीआरपीला तरुणीवर कोणतीही कारवाई करता आली नाही. रेल्वे जर आपल्याच अधिकाऱ्यांचे रक्षण करू शकत नसेल, तर सामान्य प्रवाशांचे संरक्षण कसे करणार? असा सवाल आता नेटझन्सकडून करण्यात येत आहे. दरम्यान, फ्री फ्रेस जर्नलने बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी अशा घटनेची पुष्टी केली परंतु कोणत्याही पक्षाने औपचारिक तक्रार किंवा एफआयआर दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले. (वाचा - Miscreants Urinate On Student's Face: मेरठमध्ये विद्यार्थ्याचे अपहरण, मारहाण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या चेहऱ्यावर केली लघवी; Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)