Ticket Checking Drives: पश्चिम रेल्वेच्या पथकाकडून तिकीट तपासणी मोहीम; एप्रिल ते जून दरम्यान वसूल केला तब्बल 52 कोटी रुपयांहून अधिक दंड
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्यामते, जून 2024 मध्ये, बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह, 2.25 लाख तिकीटविहीन तसेच अनियमित प्रवाशांकडून 14.10 कोटी दंड वसूल करण्यात आला.
Ticket Checking Drives: पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळावीत यासाठी, मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समध्ये सतत तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तिकीट नसलेल्या किंवा अनियमित प्रवाशांच्या त्रासाला आळा घालता यावा यासाठी रेल्वेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने, एप्रिल ते जून 2024 या महिन्यांत अनेक तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले. याद्वारे रेल्वेने 52.14 कोटी रुपये दंड वसूल केला. यामध्ये मुंबई उपनगर विभागातील 14.63 कोटी दंडाची रक्कम समाविष्ट आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्यामते, जून 2024 मध्ये, बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह, 2.25 लाख तिकीटविहीन तसेच अनियमित प्रवाशांकडून 14.10 कोटी दंड वसूल करण्यात आला. तसेच, जून महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरी विभागातील जवळपास 1 लाख प्रवाशांकडून 4.35 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. रेल्वेकडून एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल आणि जून 2024 मध्ये जवळपास 13,000 अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे आणि सुमारे 43.64 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Milk Adulteration: नागरिकांना दिलासा! दुधात भेसळ करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, राज्य सरकार घेणार कडक भूमिका)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)