Aaditya Thackeray On Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातील योजना पूर्ण करण्यासाठी ते पैसे कसे आणतील हे त्यांना स्पष्ट करावे लागेल; अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची टीका
ही केवळ विधाने आहेत. महाराष्ट्र त्यांचे ऐकणार नाही,' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Aaditya Thackeray On Maharashtra Budget 2024: आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका होत आहे. शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील महायुतीने मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 'ते कितीही प्रयत्न करत असले तरी ते पैसे कसे आणतील हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. ही केवळ विधाने आहेत. महाराष्ट्र त्यांचे ऐकणार नाही,' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (हेही वाचा - Maharashtra Budget for Farmers: कृषीपंप थकीत वीजबिल माफ, सौरउर्जा पंपास प्राधान्य; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पात विशेष घोषणा)
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)