Gram Panchayat Election 2022: सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील नवरदेवाने लग्न समारंभ संपल्यावर बजावला मतदानाचा हक्क

राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच निवड असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली.

Gram Panchayat Election 2022: सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील नवरदेवाने लग्न समारंभ संपल्यावर बजावला मतदानाचा हक्क
नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क (PC - Twitter)

Gram Panchayat Election 2022: उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील मोहन नवनाथ कांबळे या नवविवाहित वराने आपले लग्न लागताच थेट मतदान केंद्र गाठले व आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीमध्ये असताना प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, असा संदेश यावेळी या युवकाने दिला. रविवारी राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. राज्यातील ३४ जिल्ह्यांत ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच निवड असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली. (हेही वाचा - Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, २० डिसेंबरला कळणार जनतेचा कौल कुणाला!)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).