Thane Shocker: दहावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका न दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावर केला चाकूहल्ला; भिवंडीमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

याच्याच रागात तिघांनी परीक्षा हॉलमधून बाहेर येताच त्याला पकडून बेदम मारहाण केली.

हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दहावीच्या लेखी परीक्षेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी तीन विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रावर चाकूहल्ला केल्याचा आरोप आहे. वर्गमित्राने उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिल्याने या तीन मुलांनी त्याच्यावर चाकूहल्ला केला. मंगळवारी परीक्षेनंतर ही घटना घडली, त्यानंतर जखमी विद्यार्थ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेदरम्यान पीडितेने परीक्षेदरम्यान आरोपी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला होता. याच्याच रागात तिघांनी परीक्षा हॉलमधून बाहेर येताच त्याला पकडून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तीन अल्पवयीन आरोपींविरुद्ध भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: Rail Accident in Mumbai: सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये मोबाईल चोराला पकडण्याच्या नादात प्रवाशाने गमावला जीव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)