'गणवेशात रिल्स शूट केलेल्या महिलेचे निलंबन चुकीचे'; आमदार Rohit Pawar यांनी मुख्यमंत्र्यांना केली 'ही' विनंती
आता यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका महिला कंडक्टरला बसमध्ये व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यांनतर महामंडळावर मोठी टीका होत आहे. अनेक राजकारणी लोकांनीही महामंडळाचा हा तडकाफडकी घेतलेला निर्णय चुकीचे असल्याचे सांगितले आहे. आता यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
घडल्या प्रकारावर रोहित पवार म्हणतात, ‘गणवेशात रिल्स केल्याचा आक्षेप असेल तर 'कारणे दाखवा' नोटीस देऊन ही चूक सुधारण्याची संधी देता आली असती. पण त्याऐवजी थेट निलंबनाची कारवाई हा घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो. यात योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला द्याव्यात, ही विनंती!’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)