'सुशांतसिंग व दिशा सालियन यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी होईल, मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार'- Minister Narayan Rane यांचा दावा

काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते

Narayan Rane (Photo Credit- Credit - Twitter)

काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप आणि सेनेमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीदेखील पत्रकार परिषद घेऊन सेनेवर टीकास्त्र सोडले. त्या टीकेला सेनेचे खासदार विनायक राऊत प्रत्युत्तर दिले. नारायण राणेंच्या मागे जेव्हा ईडी लावली तेव्हा ते भाजपासाठी सरेंडर झाले, असे म्हणत राऊत यांनी 3 व्हिडीओ दाखवत राणेंवर टीकास्त्र सोडले.

आता याला प्रत्युत्तर देताना, ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी’, असे म्हणत नारायण राणे यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली, त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले ‘बॉस’ आणि आपण कुठे धावणार?’

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement