Supriya Sule Phone And WhatsApp Working: सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप सुरू; पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार
यासंदर्भात माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, 'माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार.'
Supriya Sule Phone And WhatsApp Working: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रविवारी आपला फोन आणि व्हॉट्सअप हॅक (WhatsApp Hacked) झाले असल्याची माहिती दिली होती. आता सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप आणि फोन सुरु झाला असून याबाबत त्यांनी आपल्या एक्स हँडलवरून माहिती दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, 'माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व.'
नागरीकांना माझी विनंती आहे की, आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. (हेही वाचा - Supriya Sule Phone And WhatsApp Hacked: सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक; सोशल मीडियावर दिली माहिती)
सुप्रिया सुळे यांचे ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)