Supriya Sule vs Sunetra Pawar: बारामती मध्ये लोकसभा निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर; झळकले सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स

एक्झिट पोलचा अंदाज पाहून उत्साही कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींच्याही विजयाचे पोस्टर झळकवले आहेत.

सुप्रिया सुळे । Twitter

महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे सार्‍यांचे लक्ष आहे. पवार कुटुंबातील नणंद-भावजया एकमेकींसमोर निवडणूकीच्या रिंगणात असताना आता एक्झिट पोलचा अंदाज पाहता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींच्याही विजयाचे पोस्टर झळकले आहेत. एक्झिट पोल मध्ये अजित पवारांना एकाच जागेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ती 1 जागा कोणती असेल यावर तर्क बांधले जात आहेत तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असेल असे अंदाज एक्झिट पोल मध्ये आल्यानंतर आता बारामतीची जागा शरद पवारांकडेच असेल असे मानून त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जल्लोष सुरू केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement